बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या राहत्या घरी बुधवारी मध्यरात्री घुसलेल्या चोरट्याने त्यांच्यावर धारदार चाकूने ६ वार केले असून त्यांच्या घरातील एका केअयटेकर जखमी झाली आहे. गुरूवारी सकाळी ही बातमी उघडकीस आली आणि प्रचंड खळबळ माजली. या घटनेनंतर वांद्र्यातील हायप्रोफाईल सोसायट्यांच्या सुरक्षततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांनंतर तिथल्या आणखी एका सोसायटीला चोराने सुरक्षारक्षकाला धमकावल्याची घटनाही समोर आली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूरचाही जबाब नोंदवला जाणार आहे.
बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेता सैफ अली खान तसेच त्याच्या घरातील एक केअरटेकर जखमी झाली. दोघांवरही लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. सैफ अली खानवर ६ वार झाले असून २ वार खोल असून त्यांच्या पाठीवरही वार झाले आहेत. सैफ आणि त्यांच्या केअरटेकरवरही लीलावतीमध्ये उपचार सुरु असल्याचे समजले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून वांद्रे सेफ आहे का असा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे. त्यांनंतर तिथल्या आणखी एका सोसायटीला चोराने सुरक्षारक्षकाला धमकावल्याची घटनाही समोर आली आहे. ही घटना गेल्या आठवड्यात १२ जानेवारी रोजी घडली असून वांद्रे येथील स्कायपर टॉवर सोसायटीत हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.
चोराने मालकाला आणि सुरक्षारक्षकाला धमकावलं
इम्रान कुरेशींनी दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारीला २ चोर त्यांच्या सोसायटीत घुसले होते. त्यावेळी सुरक्षारक्षक त्यांना पकडण्यासाठी गेले असता दोघांपैकी एक जण पळून गेला आणि दुसरा पकडला गेला, यानंतर आम्ही तातडीने १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले, अर्ध्या तासानंतर पोलीस आले आणि आम्ही आमच्या सुरक्षा रक्षकाने पकडलेल्या चोराला वांद्रे पोलीस ठाण्यात पाठवले, असे कुरेशी यांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूरचाही जबाब नोंदवला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांची पत्नी करीन कपूर खानचा देखील जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा देखील सामना झाला होता . त्यामुळे तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे, असे समजते.
हे ही वाचा :
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती