spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

Sharad Pawar आणि chhagan bhujbal आज पुण्यात एकाच मंचावर; भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

पुण्याजवळील चाकणे येथे महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यासाठी शरद पवार-छगन भुजबळ एकाच मंचावर असतील.पुण्याजवळील चाकण येथील महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर उपस्थित असतील. मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर सुद्धा केली आहे. त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान ते परदेशात गेले होते. तिथून परत आल्यावर आता पवारांसोबत ते मंचावर असतील. ते यावेळी काय भावना व्यक्त करतात. काय मत मांडतात. कुणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात भेट झाली आहे. पक्ष फुटल्यानंतर भुजबळांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. ते अजितदादांसोबत गेले. पण त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले आहे. उलट त्यांनी पवारांबद्दल आदरभाव दाखवला आहे. आता मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली आहे.महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर असतील. हा कार्यक्रम सायंकाळी साडेचार वाजता होईल. यावेळी शरद पवारच नाही तर छगन भुजबळ काय मत व्यक्त करतात याची चर्चा होत आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावात आज कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील. अजित पवार या कार्यक्रमाला येणार आहेत की नाही, हे आपल्याला माहिती नाही. ते परदेशात आहेत, ते येतील की नाही हे माहिती नसल्याचे भुजबळ म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. तर रासपचे महादेव जानकर यांनी भुजबळ यांना समता परिषदेचा पक्ष काढण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर विचारले असता ती त्यांची सूचना असल्याचे सांगत त्यांनी या मुद्दावर अधिक भाष्य टाळले.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss