spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

Sindhutai Sapkal : ‘अनाथांची माय’ Sindhutai Sapkal यांच्या स्मृतिदिनी जाणून घेऊ त्यांचा जीवनप्रवास

Sindhutai Sapkal : सिंधुताई सकपाळ या भारतीय समाजसेविकेचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायक आहे. ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सकपाळ भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांचा हा सोनेरी प्रवास नक्की जाणून घेऊया.

सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. आई-वडिलांना मुलगी नको होती, ‘नकुशी’ होती म्हणून नाव चिंधी ठेवलं…जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतरही कायम राहिला. नवऱ्यानेदेखील चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. सिंधू ताईंवर भीक मागून जगायची वेळ आली होती. हजारो संकटांवर मात करत त्या अनाथांच्या ‘माय’ झाल्या. अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं.
वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे गाव लहान असल्यामुळे त्यांच्या गावात फारश्या सोई-सूवहिदा नव्हत्या. घरची परिस्थिती बिकट असल्यामुले त्याचे शिक्षण चौथीपर्यंत झाले. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि माई शाळेत जाऊन बसायच्या.
माईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांच्या सासरीदेखील त्यांना प्रचंड सासुरवास भोगावा लागला. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. शेकड्यांनी गुरे असलेल्या त्या गावातील शेणाचा लिलाव करण्यासाठी वनखात्यातील अधिकारी यायचे. या लिलावाविरोधात माईंनी बंद बुकरला आणि या लिलावामुळे ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या बेईमानीच्या कमाईवर गदा आली आणि माईंनी हा लढा जिंकला पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. गावातील सावकाराचे यामुळे आर्थिक संबंध बिघडले आणि याचा बदल म्हणून त्या सावकाराने माईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला.नवऱ्याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय घेत त्यांना मारहाण करून माईंना घराबाहेर काढले.
सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या.सासरमधून मारून बाहेर काढल्यानंतर माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही. जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला पण नंतर त्या मागे फिरल्या. त्यानंतर माईंनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. या ठिकाणी अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला, त्यांना जेवण, कपडे पुरवले.
माईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट २०१४ साली प्रदर्शित झाला आहे.स्वत:चंच नव्हे तर हजारो अनाथांच्या ‘अवघ्या जीवनाचं सोनं’ केलं.अशा या ‘अनाथांच्या माय’ असलेल्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास वयाच्या ७५ व्या वर्षी संपला.त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss