Saturday, April 20, 2024

Latest Posts

या कारणामुळे झोपलेले पक्षी झाडांवरून पडत नाही…

आपण लहानपणी पक्ष्यांच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे आपल्या सर्वाना ठाऊकच असेल की सूर्य मावळल्यानंतर पक्षी झाडावर जाऊन झोपतात.

आपण लहानपणी पक्ष्यांच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे आपल्या सर्वाना ठाऊकच असेल की सूर्य मावळल्यानंतर पक्षी झाडावर जाऊन झोपतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का कि पक्षी झाडावर झोपलेले असतात तेव्हा ते झोपेत खाली का पडत नाही? माणूस जेव्हा पलंगावर झोपलेला असतो तेव्हा त्याला झोपेशिवाय काहीच दिसत नाही. माणसाला झोपण्यासाठी योग्य जागा लागते. माणूस कधीच उभं राहून अथवा बसून झोपू शकता नाही. जेव्हा माणूस झोपलेला असतो तेव्हा त्याच्या मेंदूला आराम मिळतो. पण माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा बऱ्याचदा त्याचा झोपेत तोल जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पक्षी झोपलेले असताना झाडावरून खाली का पडत नाही.

पक्षी तज्ज्ञानुसार यासाठी बरीच करणे आहेत. पक्षी जेव्हा झाडावर जाऊन झोपतात तेव्हा त्यांचा एक डोळा उघडा असून त्यांचा मेंदू कार्यरत असतो. पक्षी आपल्या मेंदूवर याप्रमाणे नियंत्रण ठेवतात आणि म्हणूनच पक्षी झोपलेले असताना त्यांचा मेंदू सक्रिय असतो. त्याशिवाय पक्षी हे माणसाप्रमाणे जास्त वेळ गाढ झोपत नाहीत. त्यांचा झोपण्याचा काळ हा खूप कमी असतो.

एका मीडिया रिपोर्टच्या आधारे असे सांगितले आहे की या प्रकारच्या झोपेमुळे पक्षी झोपतानाही स्वतःचे संरक्षण करतात. गंमत म्हणजे जेव्हा पक्षांचा दावा मेंदू कार्यरत असतो तेव्हा पक्ष्यांचा उजवा डोळा उघडा असतो त्याचप्रमाणे जेव्हा पक्षांचा उजवा मेंदू सक्रिय असतो तेव्हा पक्षांचा डावा डोळा उघडा असतो. याच कारणामुळे पक्षी स्वतःचे रक्षण करतात. पक्षांचा झोपेतसुद्धा मेंदू सक्रिय असल्यामुळे ते स्वतःचे संरक्षण करतात जरी शिकारी देखील त्यांच्या जवळ असला तरी त्यांना पटकन जाणवत. पक्ष्यांच्या पायाला असलेल्या पोतामुळे ते झोपेत असताना सुद्धा फांद्या पकडतात. पक्षांच्या पंजा हा भरपूर मजबूत असतो. पक्षांचा पंजा जणू काही एखाद्या कुलुपासारखा असतो. पक्षी साधारण १० सेकेंदाच्या कालावधीसाठी गाढ झोपतात.

हे ही वाचा:

महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

Adipurush चित्रपट रिलीज होण्याआधीच निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, प्रत्येक थिएटरमध्ये…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss