Viral : मंगळवारपासून देशभरात छठ (Chhath Puja) या महान सणाला सुरुवात झाली आहे. हा उत्सव सुरू होताच अनेकांनी यमुनेच्या घाटावर पोहोचून यमुनेत स्नान केले. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही यमुनेची प्रदुषणामुळे दुरवस्था दिसून आली. एकीकडे नदीभोवती घाणीचे ढिगारे तर दुसरीकडे नदीत तरंगणारा विषारी फेस आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये महिलेने असं काही केलंय, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. त्या बाबत जाणून घ्या.
आज ७ नोव्हेंबर म्हणजेच आज सकाळी सूर्य अर्घ्य देऊन या महान उत्सवाची सांगता होत आहे. छठ पुजेच्या नहाय-खायच्या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार भाविक पहाटे नदीच्या घाटावर पोहोचतात आणि स्नान करतात. दिल्लीतील भाविकही स्नान आणि डुबकी मारण्यासाठी यमुनेला पोहोचले. मात्र यमुनेमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी, घाण आणि विषारी फेस आहे. अशा परिस्थितीत लोकांना सध्या त्यांच्या श्रद्धेपोटी आणि परंपरा पूर्ण करण्यासाठी यमुनेत स्नान करावे लागते. अशात एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
दिल्लीतील यमुना नदीकाठावरील छठ पूजेदरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये असे दिसत आहे कि, एका वृद्ध महिलेने चक्क यमुना नदीतील प्रदूषणामुळे जो फेस तयार झाला आहे, त्याला शॅम्पू समजून तिने तिचे केस धुण्यास सुरुवात केली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.तसेच यमुनेची अवस्था पाहून नदीत स्नान करणारे भाविक दुःखी झाल्याचे पाहायला मिळाले. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, छठपूर्वी यमुना स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून यमुनेची स्थिती सातत्याने बिघडत असून त्यांना यमुनेत स्नान करावे लागत आहे. काही लोक म्हणतात की, यमुनेत स्नान केल्याने आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे घराभोवती पाण्याचा कृत्रिम घाट घालून छठचा मोठा सण साजरा करणार आहेत. तर काही सोसायट्या, परिसर इत्यादी ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन घाट बांधले आहेत आणि पूजा करून उत्सव आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करत आहेत. ज्यांना छठपूजेसाठी घाटावर जाता येत नाही, ते घराच्या छतावर एका मोठ्या टबमध्ये उभे राहून सूर्यदेवाला अर्घ्य देतात. ७ नोव्हेंबर म्हणजेच आज सकाळी सूर्य अर्घ्य देऊन या महान उत्सवाची सांगता होत आहे.
हे ही वाचा:
लातूरच्या सभेमध्ये Raj Thackeray यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर साधला निशाणा
महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा… Sadabhau Khot यांचा Sharad Pawar यांच्यावर खोचक टीका