spot_img
spot_img

Latest Posts

भारताचे आदित्य L१ ही मोहीम भारतासाठी का आहे खास?, जाऊन घ्या सविस्तर माहिती

भारताची चांद्रयान ३ (Chandrayaan 3) ही मोहीम यशश्वी झाल्यानंतर आता भारताने सूर्य मोहीम आखली. २३ ऑगस्ट २०२३ ला भारताचे चांद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले.

भारताची चांद्रयान ३ (Chandrayaan 3) ही मोहीम यशश्वी झाल्यानंतर आता भारताने सूर्य मोहीम आखली. २३ ऑगस्ट २०२३ ला भारताचे चांद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. या मोहिमेमुळे भारताचे नाव जगाच्या इतिहासात कोरले गेले. अमेरिका, रशिया, चीन आणि आता भारताचे नाव देखील या यादीमध्ये येणार आहे. पण आता भारताने मिशन आदित्य L१ सूर्यावर जाणार आहे. अंतरातील भारताची ताकद आता वाढणार आहे. ही मोहीम सूर्याजवळ पोहचून सूर्यप्रकाशावर संशोधन करणार आहे. सूर्य मोहीम पाठवणारा भारत हा २३ वा देश आहे. भारताचे नाव देखील या यादीमध्ये सामील होणार आहे. भारताचा नंबर हा २३ वा असला तरी आदित्य L १ मध्ये बऱ्याच प्रगत यंत्रणेचा वापर केला आहे. इतर देशांपेशा भारताची ही मोहीम वेगळी असणार आहे. हे आदित्य L १ कसे वेगळे असणार आहे . जाणून घेऊया सविस्तर माहिती

आदित्य L १ (Aditya L 1) हे २ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी प्रक्षेपित होणार आहे. ही सूर्य मोहीम पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतर जाणार आहे. हे सूर्ययान सूर्याच्या किरणांचा अभ्यास आणि सूर्याशी संबंधित अनेक न उलगडलेल्या रहस्यांचा अभ्यास करणार आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारताचे नाव देखील या यादीमध्ये सामील होणार आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA, जर्मन स्पेस एजन्सी DLR, युरोपियन एजन्सी ESA या देश्याचे सूर्ययान यशश्वीपणे सूर्यावर पोहचले आहे. यामध्ये १४ यान एकट्या नासाने लाँच केल्या आहेत. आदित्य L १ ही मिशन भारतासाठी खूप खास आहे.

भारताने बनवलेले आदित्य L १ हे भारतीय बनावटीचे आहे. ते पूर्णपणे भारताने बनवले आहे. त्यात ७ पेलर्स बसवले आहेत त्यातील ६ हे भारताने बनवले आहेत. भारताने पहिल्यांदा एक अंतराळयान बनवले आहे जे सूर्यावर जाणार आहे. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये अशी काही रिकामी जागा आहे, जिथे दोघांच्या ऊर्जेचा परिणाम दिसतो. या जागेवर जास्त काळ राहणं कठीण आहे. आदित्य L १ मध्ये अशी काही यंत्रणा बसवण्यात आली हे त्याच्यामुळे यान जास्त काळ सूर्याच्या कक्षेत टिकून राहील.हे यान सूर्यावर संशोधन करेल आणि खास पद्धतीने काम करेल.

Latest Posts

Don't Miss