भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम (Nirmala Sitharaman) या काही तासातच अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. मोदी सरकार टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. महागाई (inflation) कमी होण्याची शक्यता आहे. घाऊक (wholesale) आणि किरकाेळ महागाईच्या दरात माेठी घट झाली आहे. आयएमफ (International Monetary Fund-IMF) जारी केलेल्या अहवालानुसार चालू असलेल्या आर्थिक वर्षात वाढलेला महागाईचा दर ६.८ टक्क्यावरून ५ टक्क्यावर येण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये हा दर ४ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. सादर होणाऱ्या अर्थसंकल्प मधून सामान्य जनतेला दिलासा मिळणार अस सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) च्या अहवालाने हि माहिती दिली आहे.
हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…
जागतिक चलनवाढ ही २०२२ मध्ये ८.८ टक्क्यावर होती आणि ती २०२३ मध्ये ६.६ टक्के आणि २०२४ मध्ये चनवाढीचा दर हा ४.३ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. कोरोना अगोदर हा दर ३.५ टक्के होता. जागतिक मागणीचा हा दर कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक मागणीमुळे दरामध्ये परिणाम दिसू शकतो. इंधनाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. आणि हे इंधन Fuel नसलेल्या किमतींवर आधारित आहे. चलनवाढ २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ६.९ टक्के होते त्याच्या अंदाजानुसार २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ४.५ टक्क्यावर येईल असे सांगण्यात येत आहे.
देशामध्ये महागाई कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आणि वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर महागाई कमी होण्या चे कारण जगभरात मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात केलेली वाढ त्यामुळे सुद्धा महागाई कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भाकीत केले आहे कि येणारी भारतीय अर्थव्यवस्था हि सर्वात वेगवान अर्व्यवस्था राहू शकते. कारण येणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६.१ टक्के वाढ असल्यामुळे हि अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगवान राहण्याची शक्यता आहे. त्या वेळी भारताची मागणी देशील लवचिक आहे. १८ महिन्यांनंतर घाऊक महागाईचा दर एक अंकी आकड्यात आला आहे.
हे ही वाचा:
MPSC परीक्षेतील ‘या’ बदलांमुळे विद्यार्थ्यांनी केले होते आंदोलन
आमचं ‘सर्वसामान्यांचे सरकार’ बोलतात मात्र कुठेही महागाई कमी करण्याचा…, अजित पवार