आज अर्थी मंत्री निर्मला सीतारामन देशाचा २०२५ -२६ साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींकडून बजेट मांडण्यास मंजुरी देखील मिळाली आहे. बजेट सादर होण्यापूर्वी दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ७ रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत १८०४ रुपयांना मिळणार आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत ३२,५०० रुपयांनी वाढवल्या आहेत. अशे एकूण फेब्रुवारी महिन्यात ४ बदल होणार आहे.
1. व्यावसायिक सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी
आजपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ७ रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत ७ रुपयांनी कमी होऊन १७९७ रुपये झाली. यापूर्वी ते ₹ १८०४ मध्ये उपलब्ध होते. कोलकातामध्ये, ते ₹१९०७ मध्ये उपलब्ध आहे, ४ रुपयांनी कमी, पूर्वी त्याची किंमत ₹१९११ होती. मुंबईत सिलेंडर १७५६ रुपयांवरून ६.५० रुपयांनी कमी होऊन १७४९.५० रुपयांवर आला आहे. चेन्नईमध्ये सिलिंडर १९५९.५० रुपयांना मिळतो. तथापि, १४.२ KG घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये ₹८०३ आणि मुंबईमध्ये ₹८०२.५०मध्ये उपलब्ध आहे.
2. मारुतीच्या गाड्या ३२,५०० रुपयांनी महागल्या
मारुती सुझुकीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती ३२,५०० रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. ज्या मॉडेल्सच्या किमती बदलतील त्यामध्ये Alto K10, S-Presso, Celerio, Wagon R, Swift, DZire, Brezza, Ertiga, Ignis, Baleno, Ciaz, XL6, FrontX, Invicto, Jimny आणि Grand Vitara यांचा समावेश आहे.
3. एटीएफ 5,269 रुपयांनी महाग : हवाई प्रवास महाग होऊ शकतो
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एअर ट्रॅफिक फ्युएल (ATF) च्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवास महाग होऊ शकतो. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत ATF 5078.25 रुपयांनी महाग होऊन 95,533.72 रुपये प्रति किलोलिटर (1000 लिटर) झाला आहे.
4. कोटक महिंद्रा बँकेने सेवा शुल्क आणि नियम बदलले
कोटक महिंद्रा बँकेने काही वस्तूंवर सेवा शुल्क वाढवले आहे. कोटक बँकेने त्यांच्या डेबिट कार्ड धारकांसाठी मोफत एटीएम व्यवहाराची मर्यादा बदलली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे या बदलाची माहिती दिली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज म्हणजेच 1 फेब्रुवारीलाही कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 87.62 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रतिलिटर आहे.
हे ही वाचा :