Friday, April 19, 2024

Latest Posts

अर्थसंकल्पेत जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प २०२३-२४ सादर केला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात महिलां बरोबरच जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प २०२३-२४ सादर केला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात महिलां बरोबरच जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात महिलांना सर्वात मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केले आहे कि जेष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये गुंतवणुकीची मर्यादा १५ लाखावरून ३० लाखापर्यंत केली आहे. आता जेष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

जेष्ठ नागरिक बचत योजना हि देशातील जेष्ठ नागरिकांसाठी आहे. हि योजना नियतकालिक काळासाठी जेष्ठ नागरिकांना त्याच्या लाभासाठी चालू आहे. हि योजना २००४ मध्ये चालू केली होती. निवृत्त व्यक्तींना आर्थिक मदत देणे हा त्यांचा हेतू होता. या योजने त्यांच्या उत्पन्नचा नियमित प्रवाह चालू राहतो. देशभरात जेष्ठ नागरिकांसाठी अनेक सुरक्षा आणि कर बचहत फायदे आहेत. देशातील अनेक बँका आणि पोस्ट ऑफिस या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांना देत आहेत. सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प जेष्ठ नागरिक योजना वरील व्याजदर हा ८% पर्यंत वाढवला आहे. या अर्थसंकल्पनातून २०२३ मध्ये योजनेतील गुंतवणुकेची मर्यादा १५ लाख रुपयांवरून ३० लाख रुपये करण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वेबसाईटवर जाऊन त्या बद्दल जाऊन घ्यावे. आणि तुम्हाला त्या योजनेचा फायदा कसा मिळणार हे समजून घेऊ या. या योजनेत ठेवीदार ५ वर्षाच्या कालावधीनंतरही खाते आणखी ३ वर्षासाठी वाढवू शकतो. नियमानुसार केलेल्या ठेवीवर सरकारकडून वेळोवेळी त्रैमासिक व्याजाचा लाभ मिळेल. जर खातेदाराने दार तिमाहीत व्याजाचा दावा केला नाही तर त्याला अतिरिक्त व्याज मिळणार नाही. पती आणि पत्नी हे दोघेही एकमेकांसोबत सिंगल खाते किंवा जॉईंट खाते उखडू शकतात. ठेवीदार एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना नामनिर्देशित करू शकतो. ठेवीदाराने केलेले नामांकन रद्द केले जाऊ शकते. किंवा ते बदल जाऊ शकते. खाते उघडताना केलेली ठेव ५ वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा ८ वर्ष पूर्ण झाल्यावर दिली जाते. एका खात्यामध्ये एका पेक्षा जास्त पैसे काढता येत नाहीत.

हे ही वाचा:

गौतम अदानी मागे टाकत मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, येथे जाणून घ्या संपूर्ण यादी

Budget 2023 विमा कंपन्यांना बजेटचा झटका, कंपन्यांचे शेअर घसरले १४ टक्क्यांनी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss