अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पाकडे या अर्थसंकल्पातून आयकरात किती सूट मिळणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्योजक, व्यावसायिकांपासून सर्वांना उत्सुकता होती. आयकरसंदर्भात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट मिळाला आहे. आता नवीन कर प्रणालीत १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही. काय आहे नवीन कर प्रणाली? कशी आहे आयकराची रचना? किती बदलला टॅक्स? जुनी कर व्यवस्था कशी होती? कोणत्या वर्षी कशी बदलली मर्यादा, बघुयात.
अशी आहे आयकराची रचना
0 ते 12 लाखांपर्यंत – काहीच कर नाही
12 ते 16 लाखांपर्यंत – 15 टक्के आयकर लागणार
16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के आयकर लागणार
20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के आयकर लागणार
24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के आयकर लागणार
ज्यांचं सामान्य उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे, कॅपिटल गेन्स वगळता, त्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल. त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही.
12 लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना 80 हजारांचा टॅक्स बेनिफिट असणार आहे. सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत 100% टॅक्स असणार आहे.
18 लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना 70 हजारांचा टॅक्स बेनिफिट असणार आहे. सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत 30% टॅक्स असणार आहे.
25 लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना 1,10,000 हजारांचा टॅक्स बेनिफिट असणार आहे. सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत 25% टॅक्स असणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येईल. आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे. त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. मात्र, याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही. टीडीएसची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली आहे. त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात येत आहे. टीडीएस-टीसीएस कमी होणार आहे.
2020 च्या अर्थसंकल्पात जेव्हा सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली, तेव्हा लोक ती स्वीकारण्यास तयार नव्हते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. त्यांनी सांगितले की, आयकर दात्यांना जुन्या कर प्रणाली नवीन कर प्रणालीपेक्षा चांगली आणि अधिक फायदेशीर वाटत होती. पण आता देशातील 65 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे. म्हणजेच प्रत्येक 3 पैकी 2 लोक नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर भरत आहेत. गेल्या एका वर्षात या डेटामध्ये बरेच बदल झाले आहेत.
आधी नवीन कर व्यवस्था अशी होती
₹0-₹3 लाख: शून्य
₹3-₹7 लाख: 5%
₹7-₹10 लाख: 10%
₹10-₹12 लाख: 15%
₹12-₹15 लाख: 20%
₹15 लाखाच्या वर: 30%
आणि जुनी कर व्यवस्था अशी
0 ते 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर: 0%
2.5 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्नावर: 5%
5 लाख ते 10 लाख रुपये उत्पन्न: 20%
10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर: 30% अशी होती.
कोणत्या वर्षी कशी बदलली मर्यादा
2005 : 1 लाख रुपये
2012 : 2 लाख रुपये
2014 : 2.5 लाख रुपये
2019 : 5 लाख रुपये
2023 : 7 लाख रुपये
2025 : 12 लाख रुपये
यंदा सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाने तुम्ही समाधानी आहात का? आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडीओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा.
हे ही वाचा :
केंद्रीय अर्थसंकल्पाचा बजेट तुम्हाला कधी आणि कुठे पाहायला मिळणार