spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Union budget मध्ये अनु क्षेत्रासाठी २० हजार कोटीची तरतूद

Union Budget 2025: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेले केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी आज 1 फेब्रुवारी २०२५रोजी देशाचा अर्थसंकल्प २०२५-२६ (Union Budget 2025) सादर केला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. यावेळी भारताला अणुऊर्जेचे केंद्र बनवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अणु क्षेत्रासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अणुऊर्जा अभियानांतर्गत, विकसित भारतासाठी २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा विकसित केली जाईल. यासाठी अणुऊर्जा कायद्यात सुधारणा केली जाईल. याशिवाय सरकार जहाजबांधणीवर भर देत असल्याने जहाजबांधणी आर्थिक सहाय्य योजना पुन्हा सुरू केली जाईल. जहाज बांधणी गटांना सुविधा पुरवल्या जातील, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बोलते वेळी दिली आहे.

तर, मोदी सरकारनं बजेटमध्ये नोकरदारांना मोठा दिलासा दिलाय. नव्या अर्थसंकल्पानुसार, आता १ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. याचा अर्थ महिन्याला एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाला कोणालाच कर नसेल. आतापर्यंत सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. नव्या कररचनेतही मोठे बदल करण्यात आलेत. याबाबत पुढच्या आठवड्यात नवं आयकर विधेयक सादर करण्यात येणार आहे. त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल माहिती देण्यात येईल. टॅक्स स्लॅबमधल्या बदलामुळे सरकारचा एक लाख कोटींचा महसूल घटणार आहे.

निर्यात करणाऱ्या एमएसएमईला 20 कोटींपर्यंत मुदत कर्ज-
– एमएसएमई हे अर्थव्यवस्थेचं दुसरं इंजिन
– सध्या 1 कोटी नोंदणीकृत एमएसएमई आहेत
– 7.5 कोटी लोकांना एमएसएमईमध्ये रोजगार आहेत
– देशाची 36 टक्के निर्मिती एमएसएमईमध्ये होते
– देशाची 45 टक्के एमएसएमईमधून होते
– एमएसएमईला वित्तपुरवठा वाढवणार
– एमएसएमईच्या क्रेडिट गॅरंटीत वाढ करणार
– पुढच्या पाच वर्षात 1.5 लाख कोटी वित्त पुरवठा करणार
– निर्यात करणाऱ्या एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचं मुदत कर्ज

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा-

भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. कृषी, लघू मध्य उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार इंजिन्स असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. यावेळी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली. या योजनेमुळे १०० जिल्ह्यांना फायदा होईल. कमी उत्पादन क्षमता असलेल्या राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. ही योजना केंद्र आणि राज्य सरकार मिळून राबवतील देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असा दावा सीतारामन यांनी केला. आजच्या अर्थसंकल्पात लघु, लहान व मध्यम उद्योगांसाठी त्याचप्रमाणे महिलांसाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

मध्यान्ह भोजनात अंडी बंद केल्याने जितेंद्र आव्हाड संतापून अंडी आणि नाचणी सत्त्व घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

Union Minister Ramdas Athawale यांची अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात फटकेबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss