Rahul Gandhi on Budget : Congress Leader राहुल गांधी यांनी आज अर्थसंकल्पावर प्रसार माध्यमांशी कोणतेही भाष्य केले नाही आहे. मात्र, ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी लोकसभेत वार्षिक सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पगारदारांना मोठी सूट देण्यात आली असून १२ लाख उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. तसेच शेतीपासून संरक्षणापर्यंत सर्व गोष्टींसाठी तरतूद करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी हा अर्थसंकल्प शेतकरी, मध्यमवर्गीय आणि गरिबांचा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे, तर विरोधकांनी राजकीय म्हटले आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात, आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण हे सरकार विचारांचे दिवाळखोर असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
तर, BSP चे सुप्रीमो मायावती यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन राष्ट्रीय हिताचे कमी आणि राजकीय हिताचे जास्त असे केले आहे. Samajwadi Party प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सरकारने अर्थसंकल्पाच्या आकडेवारीसह कुंभमेळ्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.एमएसएमई (MSME) क्षेत्रासाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर दुप्पट केल्याबद्दल आणि ₹ १.५ लाख कोटी जोडल्याबद्दल अभिनंदन. यामुळे स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन मिळेल आणि उत्पादन केंद्रांना चालना मिळेल. पादत्राणे, चामडे आणि खेळणी उत्पादन उद्योगांवर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित केल्याने तळागाळातील नोकऱ्यांना चालना मिळेल, ज्यामुळे पंतप्रधान मोदींचे विकसित भारताचे स्वप्न पुढे जाईल.असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे.
हे ही वाचा :
Union budget मध्ये अनु क्षेत्रासाठी २० हजार कोटीची तरतूद
Union Minister Ramdas Athawale यांची अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात फटकेबाजी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .