दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहिल्यास जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या दबावाखाली आहे आणि रुपयाचे अवमूल्यन झपाट्याने होत आहे. वित्तीय तूट कमी करणे, महागाई न वाढवता विकासकामांना चालना देणे आणि जास्तीत जास्त संसाधने उभारणे अशी खडतर आव्हाने अर्थमंत्र्यांसमोर असतील. आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की देशाचा आर्थिक विकास दर २०२३-२४ मध्ये ६.५ टक्के राहील, तर चालू आर्थिक वर्षात तो ७ टक्के होता. अशा परिस्थितीत, हा विकास दर सुनिश्चित करण्यासाठी पावले देखील अर्थसंकल्प २०२३ मध्ये समाविष्ट केली जातील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वेळापत्रक
वेळापत्रकानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ९:२० वाजता राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या, त्यानंतर सकाळी १०:०० वाजता संसद भवनात पोहोचल्या. तिथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात अर्थसंकल्पाला अंतिम रूप देण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण लोकसभेत सुरू झाले. त्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होत आहे. दुपारी ३:०० वाजता, अर्थमंत्री नॅशनल मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि अर्थसंकल्पाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देतील.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आकर्षक असेल, अशी अपेक्षा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच होती. एकीकडे टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांपासून रस्त्यावरील फेरीवाले आणि मजुरांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील लोकांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला आहे. एकंदरीत अर्थमंत्र्यांचा २०२३-२०२४ अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या खिशाला खूप परवडणारा आहे . त्यांनी ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्त करून जनतेला खूश केले. त्याचबरोबर हिऱ्यांचे दागिने स्वस्त करून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला.
हे ही वाचा:
Budget 2023 केंद्राच्या अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणत रोजगारनिर्मिती करणार, देवेंद्र फडणवीस
…आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही, नाना पटोले