अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. सीतारमण यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पायामध्ये त्यांनी विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये या अर्थसंकल्पात युवक, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ५. ७ कोटी लघुउद्योग देशात येणार तर लघुउद्योगाद्वारे ७.५ कोटी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यातून ३६ टक्के उत्पादन केलं जातंय. आपल्या निर्यातीपैकी ४५ टक्के निर्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगातून केली जाते. सूक्ष्म आणि लघु उदयोगांचं रोजगार निर्मितीसाठी मदत केली जाणार आहे.
उत्पादन क्षेत्रात काम करता यावे यासाठी युवकांचा कौशल्य विकास, कौशल्य प्रशिक्षणासाठी ५ राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची उभारणी करणार आहे. छोट्या उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड साठी ५ लाखांची मर्यादा, स्टार्टअपची १० कोटींवरून २० कोटींची क्रेडिट लिमिट असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षांपासून मेडिकल कॉलेजमध्ये १० हजार, आयआयटीच्या ६५०० जागा वाढवणार तर देशात ३ AI एक्सल्स सेंटर उभारणार आहे.
सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० योजना जाहीर तर ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाईल. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल. अटल टिकरिंग लॅब अशा ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षात सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना, ई श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी होणार असल्याची घोषणा केली आहे.
हे ही वाचा :
केंद्रीय अर्थसंकल्पाचा बजेट तुम्हाला कधी आणि कुठे पाहायला मिळणार