Union Budget 2025: यंदाच्या मोदी कॅबिनेट ३.० च्या केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्याकडून आज १ फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प सादर होत आहे. आज अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या बजेटमध्ये १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.