spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Union Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाला Nirmala Sitharaman यांच्याकडून झाली घोषणा

यंदाच्या मोदी कॅबिनेट 3.O च्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज १ फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. आज अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. निर्मला सीतारमण आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. आज सकाळी ११ वाजता बजेट सादर करतील. या अर्थसंकल्पाविषयी उद्योजक, व्यावसायिक ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना उत्सुकता आहे.

यंदाच्या मोदी कॅबिनेट ३.० च्या केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्याकडून आज १ फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प सादर होत आहे. आज अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. निर्मला सीतारमण आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली आहे. आज सकाळी ११ वाजता बजेट सादर करायला सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पाविषयी उद्योजक, व्यावसायिक ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना उत्सुकता आहे. या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाले की, देशाला प्रगतीकडे नेणं आमचं लक्ष्य, देशाला प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असणार आहे. देश म्हणजे केवळ जमीन नाही तर देश म्हणजे जनता. कृषिक्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्याकडे आमचा भर आहे तर १०० जिल्ह्यांसाठी आणि १.७ कोटी शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनांचा लाभ घेता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट. खाजगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर आहे. विकासदर वाढवणं, सर्वंकष विकास, खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या हेतूनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं आहे.

किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादेत ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाईल. कापूस उत्पादकता वाढविण्याला  प्रोत्साहन देणार तर मत्स्य पालनाला प्रोत्साहन देण्यावर भर देणार असल्याचे सूचित केले आहे.

सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० योजना जाहीर तर ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाईल. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल. अटल टिकरिंग लॅब अशा ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षात सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील.

डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार ६ वर्षाचा कार्यक्रम सुरु करणार असून तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरु केला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षांपासून मेडिकल कॉलेजमध्ये १० हजार, आयआयटीच्या ६५०० जागा वाढवणार तर देशात ३ AI एक्सल्स सेंटर उभारणार आहे.

व्हिजासाठीचे नियम सोपे करून व्हिजा देण्याच्या पद्धतीत सुलभता आणणार असून भगवान बुद्धांशी संबधित जागांचा विकास करणार आहे. विकसित भारतासाठी न्यूक्लियर एनर्जी मिशन २०४७ पर्यंत न्यूक्लियर एनर्जीच्या माध्यमातून १०० गिगावॅट ऊर्जा उत्पादनाचं लक्ष्य आहे.

एकूण २०,००० कोटी रुपयांचे अणुऊर्जा मिशन तयार केले जाईल, २०४७ पर्यंत १०० GW अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. प्रथमच व्यवसाय करणाऱ्या पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांच्या सरकार २ कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

हे ही वाचा :

केंद्रीय अर्थसंकल्पाचा बजेट तुम्हाला कधी आणि कुठे पाहायला मिळणार

मध्यान्ह भोजनात अंडी बंद केल्याने जितेंद्र आव्हाड संतापून अंडी आणि नाचणी सत्त्व घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss