spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Union Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पात काय होणार स्वस्त आणि काय महागणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांसाठी आकांक्षांना न्याय देण्याच्या दृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये १० क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. शेती, उत्पादन, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग, ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर देण्यात आला आहे.

अर्थसंकल्प २०२५ मध्ये काय होणार स्वस्त ? 

  • इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे विशेषतः टीव्ही आणि मोबाईल फोनच्या ओपन सेल आणि तर घटकांवरील मूलभूत सीमाशुल्क कमी करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांच्या किंमती कमी होऊ शकतात.

  • कर्करोगाशी संबंधित औषधे

सरकारने ३६ जीवनरक्षक औषधांवरील मूलभूत सीमाशुल्कांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • भारतात बनवलेले कपडे

भारतीय उत्पादित कपड्यांवर कर सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे देशांतर्गत वस्रोद्योगाला चालना मिळेल आणि कपडे स्वस्त होतील.

  • चामड्याच्या वस्तू

लेदर आणि लेदर उत्पादकांवरील कर कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांच्या किंमती कमी होऊ शकतात.

  • बॅटरीवरील कार

इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे बॅटरी कार स्वस्त होऊ शकतात.

  • वैद्यकीय उपकरणे

जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणांवरील सीमाशुल्क कमी करण्यात आले आहेत.

अर्थसंकल्प २०२५ मध्ये काय होणार महाग  ?

अर्थसंकल्पात काही वस्तू स्वस्त घोषित करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी काही वस्तूंवर कर वाढण्याची शक्यता आहे, परंतु सरकारने अद्याप याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली नाही. तसेच अनेक वस्तूंच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने घराच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मोठे टीव्ही, बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे. विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत.

दरम्यान, या बजेटमध्ये स्टार्टअपसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून कर्जाची मर्यादा १० कोटींवरून २० कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये केअर सेंट उभारण्याचा निर्णय घेणार आला आहे. केंद्रसरकारने तेवढ्यावरच न थांबता करदात्यांना आनंदाचा बोनस दिला आहे. सरकारने थेट १२ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त केले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे मोठी करबचत होणार असून मध्यमवर्गीयांसाठी आणि नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

केंद्रीय अर्थसंकल्पाचा बजेट तुम्हाला कधी आणि कुठे पाहायला मिळणार

 

मध्यमवर्गीयांना मोदी सरकारच मोठं गिफ्ट! १२ लाखांपर्यंत आयकर लागणार नाही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss