यंदाच्या मोदी कॅबिनेट 3.Oच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. आज अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. निर्मला सीतारामन आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. आज सकाळी ११ वाजता बजेट सादर करतील. या अर्थसंकल्पाविषयी उद्योजक, व्यावसायिकांपासून सर्वांना उत्सुकता आहे. बजेट तुम्हाला कुठे आणि कधी पाहायला मिळणार आहे हे जाणून घेऊ या.
गेले वर्ष हे निवडणुकीचे वर्ष होते. लोकसभा निवडणूक असल्याने दोनदा बजेट सादर झाले. केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी 23 जुलै 2024 रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा सत्तेत आली. आता दोन दिवसांनी पूर्ण बजेट सादर होणार आहे.
येथे पाहा देशाचा अर्थसंकल्प
तुम्ही देशाचा अर्थसंकल्प विविध प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण नेहमीप्रमाणे डीडी न्यूजवर पाहता येईल. याशिवाय डीडी नॅशनलवर सुद्धा अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण होईल. आता स्मार्टफोन एजच्या जमान्यात तुमच्या मोबाईलवर तुम्ही डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही केंद्रीय अर्थसंकल्प पाहू शकता.
संसद टीव्ही
दूरदर्शन प्रसारण
संसद टीव्ही आणि दूरदर्शनचे YouTube चॅनल थेट प्रवाह
अर्थ मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट थेट पाहा
टाईम महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर तुम्ही बजेट लाईव्ह पाहू शकता.
टाईम महाराष्ट्रची YouTube लिंक – www.youtube.com/@TimeMaharashtra
Time Maharashtra च्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉइन व्हा आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घ्या.
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT1eHNPehAKJO