१९ फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरात मुरलीधर मोहळ यांच्या सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या आयटी इंजिनियर देवेंद्र जोग याला गजा मारणे याच्या टोळीने मारहाण केली होती. या मारहाणीत देवेंद्र जोग याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड टाकलं होतं. पण आता याच प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह पाच गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वे मकोका ही कारवाई केली आणि खुद्द गजा मारणे यालाच तुरुंगात टाकले