मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे 8 दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे. अश्यातच राज ठाकरे देखील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. मनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यात प्रचंड घमासान आहे. त्यांना राजेश मोरे आव्हान द्यायचे प्रयत्न करतायत पण प्रत्यक्षात काय घडतेय ते सांगतायत Face 2 Face मध्ये मनसे आमदार राजू पाटील…