छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी नाकारल्या नंतर त्यांनी OBC ची लढाई म्हणत पक्षाचे प्रमुख अजित पवारांशी पंगा घेतलाय. याआधी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना नडणारे भुजबळ तिसऱ्या बंडाच्या उंबरठ्यावर आहेत. प्रत्येकवेळी बंड करताना भुजबळ सत्तेचा आधार घेतात. आता त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अंगावर घेतलंय यावरून भुजबळांचा मार्ग स्पष्ट झालाय.