यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरे यांची ताकद किमान पुढील पाच वर्षांसाठी जवळपास संपल्यात जमा आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जरा बारकाईने विचार केल्यास उद्धव ठाकरे यांना मुंबईत मिळालेल्या १० जागा या अजूनही भाजपसाठी डोकेदुखी मानली जात आहे. राज्यभरात ठाकरे गटाचा सुपडा साफ झाला असला तरी मुंबईत त्यांची ताकद अजूनही शिल्लक आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी १० जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाला ६ जागा आणि भाजपला १४ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट कमबॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.