सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे हे अमित शहा व एकनाथ शिंदे यांच्यावर सतत दगाबाजीचे आरोप करीत आहेत. शहा व शिंदे यांचा ते सतत द्वेष करतायेत. एकदा तर तू राहशील किंवा मी राहीन अशा कठोर शब्दात जाहीरपणे हल्लबोलही केला. मतदारांनी त्याचे उत्तर मतपेटीतून दिल्यानंतरही उद्धव ठाकरे यांना कदाचित जनता कोणाच्या बाजूने आहे हे अद्याप समजले नाही असं दिसतंय. ते आपल्या व आपल्या पक्षाच्या भविष्याचा खड्डा स्वत:च खणत आहेत असे त्यांच्या भाषणावरून दिसून येते.