भाजपच्या गटनेतेपदी तसेच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शपथविधीबाबत भाष्य केले. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.