दिनांक १६ डिसेंबर २०२४ पासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवारी (२१ डिसेंबर) या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. सभागृहात मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी विधिमंडळात खडाजंगी पाहायला मिळत आहे.