बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटकही करण्यात आली. तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास रोड हा १८ किलोमीटरचा ३७ मिनिटांचा प्रवास हा आरोपी अक्षयचा शेवटचा प्रवास ठरला. तर या ३७ मिनिटांच्या प्रवासात असे काय घडले की पोलिसांना अक्षयला गोळी मारावी लागली, आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे.