देशातील श्रीमंत देवस्थांनांमध्ये ३ऱ्या क्रमांकावर असलेल्या तर महाराष्ट्र राज्यात २ऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात आपण उभे आहोत. देशात पहिल्या क्रमांकावर तिरुपती बालाजी, २ऱ्या क्रमांकावर शिर्डी येथील साईबाबा,तर तिसऱ्या क्रमांकावर प्रभादेवीचा सिद्धिविनायक मंदिर येतो. या मंदिरावर अनेक भाविकांची नितांत श्रद्धा आहे. अनेक भाविक भक्त येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्तिथ असतात. मोठमोठ्या नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत तर खेळाडूंपासून उद्योगपतींपर्यंत सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. अनेकांची मनोकामना पूर्ण करण्याची जागा म्हणजे प्रभादेवीचा सिद्धिविनायक. आता या सिद्धिविनायक मंदिरामध्ये येथे १ तारखेपासून म्हणजेच माघी गणपती पासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय न्यासाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल अनेक मतमतांतर समाजत व्यक्त होत आहेत.