Maharashtra Assembly Election 2024: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवला. यामुळे मतदानाचा गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ६५.१ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. २३ नोव्हेंबर म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये या मतदानाचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. राज्यातील १०० विधानसभा मतदार संघात बंपर मतदान झाले. आणि आता अवघ्या काही तासांत निकाल हा समोर येणार आहे. काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे. येथील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे मतदान होताच मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू झाले आहे.