संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करा. या वाल्मिकी कराडचा आका कोण आहे, आपल्याला माहिती आहे, हे कोण करतं हे मला माहिती आहे. महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम असेल आणि संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा. भर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर साधलेला हा निशाणा.