चीनमध्ये सध्या HMPV विषाणूने धूमाकूळ घातला असून भारतात देखील त्याचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारत सरकार तसेच महाराष्ट्रातही प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. मात्र HMPV ची भीती सतावत असताना राज्यातील बुलढाणा, शेगांव येथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. सुरुवातीला डोक्याला खाज सुटत असून यानंतर अवघ्या तीन दिवसांत चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.