फडणवीस सरकारचं खातेवाटप मार्गी लागल्यानंतर आता नव्या मंत्र्यांना दालनं आणि बंगल्यांचं वाटप झालंय. कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील दालनं नेमून देण्यात आलेली आहेत. महसूल मंत्री झालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला देण्यात आलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेल्या रामटेक बंगल्याची कहाणी मोठी रंजक आहे. या बंगल्यात वास्तव्यास असलेले मंत्री वादात सापडतात, अडचणीत येतात असा इतिहास आहे. त्यामुळे महसूलसारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळालेल्या बावनकुळेंच्या कारकिर्दीत अडचणी येणार का, याची चर्चा सुरु असतानाच बावनकुळेंनी हा बंगला नाकारला असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रामटेक बंगला घेतला आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी आता मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.