बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दिग्गज नेत्यांनी भरभरून दिल्यावर त्यांना सोडून जाणारे छगन भुजबळ आता तिसऱ्यांदा अजित पवारांनाही सोडणार असं चित्र दिसतंय. ओबीसींचा नेता म्हणून छगन भुजबळ यांनी स्वतःचे एक स्थान बनवले आहे. त्या दराऱ्याचा उपयोग भुजबळ यांनी समाजासाठी केला त्यापेक्षा अधिक स्वतःच्या परिवारासाठी केलाय तरीही OBC भुजबळांना आपलं मानतात यातच त्यांच्या नेतृत्वाची कलाकारी आहे .