पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून शिंदे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपलं साताऱ्यातील दरे गाव गाठलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसमध्ये आहेत. तिथे त्यांच्याबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत हेही आहेत. सामंत आणि फडणवीस यांची दोस्ती सर्वश्रुत आहे. याच दोस्तीच्या जोरावर फडणवीस, एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. २० आमदारांसहित सामंत हे वेगळा गट करून बसतील अशा स्वरूपाची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर त्यावर उदय सामंत यांना स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे.
सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला