४ जानेवारीला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले. शाह यांनी स्वतःहून भुजबळांना त्यांच्या शेजारची खुर्ची दिली. यामुळे छगन भुजबळ यांची भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज असून थेट आपली नाराजी व्यक्त करत आहेत. छगन भुजबळ यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये देखील अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला नाही. यावरून एक गोष्ट समजते की छगन भुजबळ हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायेत आणि भाजप सुद्धा भुजबळांना ग्रीन सिग्नल देत आहे. त्यामुळं भुजबळ भाजपात जाणार या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय.
अजित पवार गट आणि छगन भुजबळ यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी केली टीका