राज्यात मराठातेतर मुख्यमंत्री आणल्यास आरक्षणाचे आंदोलन पुन्हा भडकण्याची भिती आहे. त्यामुळे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तरूण मराठा नेता किंवा ओबीसी नेता बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना सगळ्या स्तरांतून समर्थन मिळत आहे.