वाल्मीक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच आहे. वाल्मीक कराडला खुणांच्या गुन्ह्याखाली अटक करून पोलिसांना सगळे धागे दोरे शोधायचे असेल. तळात जायचं असेल तर, एक महिन्याच्या पीसीआर घेतला पाहिजे. एका वर्षात 110 पेक्षा जास्त खून होतात. ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई दिसत नाही. मुख्यमंत्री बोलतात दोषींना सोडणार नाही पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता महाराष्ट्राचा जो बिहार झाला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही. जोपर्यंत वाल्मिक कराड वर खुणाचा गुन्हा दाखल होत नाही आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही