सिंधुदुर्गात राणे विरूध्द नाईक यांच्यातील रक्तरंजित संघर्ष कोकणी माणसाला नवा नाहीय. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत या दोन्ही कुटुंबातील पुढच्या पिढ्या एकमेकांशी भिडतायत. कुडाळ- मालवण मध्ये शिंदे गटाचे निलेश राणे (Nilesh Rane) आणि उबाठाचे वैभव नाईक (Vaibhav Naik) असा शिवसेना विरूध्द शिवसेना असाच मुकाबला आहे.