सध्या मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऍक्टिव्ह दिसतात याची कबूली द्यावी लागलीये. ही कबूली सुप्रिया सुळे यांनी आत्ताच दिलीये असं नाही, त्याआधी देखील त्या असंच बोलल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना डिवचण्यासाठी त्यांनी त्यावेळी ते वक्तव्य केलं होतं. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याखाली वस्तुस्थिती लपून राहत नाही. अगदी संतोष देशमुख आणि परभणी प्रकरणापासून ते दावस दौऱ्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह राहिले. ही वस्तुस्थिती फक्त सुप्रिया सुळे यांनाच दिसलेली नाहीये तर ती सगळ्या महाराष्ट्राला दिसली. हे पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्या नेत्यांची दादागिरी संपल्याचं लक्षण आहे. पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्यांची दादागिरी खरंच संपली आहे?
Supriya Sule on Devendra Fadnavis: फडणवीसांसोबत ऑन कॅमेरा चर्चेला तयार, सुप्रिया सुळेंचे ओपन चॅलेंज