राज्यात विधानसभा निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडी करणाऱ्या घोषणा करतायेत.महायुती सरकारने ऑगस्ट महिन्यापासून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली.ही रक्कम 2100 रुपये केली जाईल असंही आश्वासन अर्थमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आलं आहे.आता या योजनेला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकार आल्यास ‘महालक्ष्मी’ ही योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे.त्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेपेक्षा दुप्पट पैसे म्हणजेच तीन हजार रुपये दर महिन्याला महिलांना देण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने ‘पंचसुत्री गॅरंटी’ म्हणजेच जाहीरनाम्यातून केलं आहे.