बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले असणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.