मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला १९ दिवस उलटल्यावर बीडमध्ये सर्वपक्षीयांचा मोर्चा निघाला. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने नागरिक जमले होते. या जनप्रक्षोभ मोर्चानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे.