झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण हातात आहेत ते पैसे ही गमावून बसतात. असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. कोणी दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखतो तर कुणी तिप्पट पैशांची हमी देतो. पण नवी मुंबईत घडलेल्या घोटाळ्यात दुप्पट, तिप्पट बरोबर दहा वर्षात चौपट पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोरेस्ट गुंतवणूक कंपनी असं या कंपनीचं नाव असून नवी मुंबईसह दादर, सानपाडा, मीरा रोड, कांदिवली, कल्याण, ग्रँड रोड, भाईंदर परिसरात अशा ठिकाणी तिच्या शाखा होत्या. या कंपनीने जबरदस्त मार्केटिंग टीम नेमून लोकांना त्यांच्या पैशावर ३ ते ११% परतावा मिळेल असं आमिष दिलं आणि लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. लोकांनी त्याच लालसेपोटी १०,००० पासून ते १० लाखांपर्यंत टोरेस्टमध्ये गुंतवणूक केली.