सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या तपासाबाबत छत्रपती संभाजीमहाराज यांच्या नेतृत्वाखालील नेत्यांनी राज्यपाल सी. पी . राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्याचवेळी शरद पवार यांनी या हत्येविरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. त्यामुळे महायुती समोर नवी समस्या उभी ठाकली आहे