मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त आणि फिक्सर PS, PA, OSD यांच्याबद्दल अत्यंत कडक धोरण अंमलात आणायचं निश्चित केलं आहे. असं असतांनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काही वर्षांपूर्वी PS असलेल्या एका वादग्रस्त अधिकाऱ्याने फडणवीसांच्या नाराजीनंतरही आयुक्त होण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. वसई-विरारचे आयुक्तपद मिळावे यासाठी शिफारस मिळवण्याकरता एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांवर स्वतः एकनाथ शिंदे नाराज होत प्रचंड संतप्त झाले. संतापाच्या भरात जमदग्नीच्या अवतारात उपमुख्यमंत्र्यांनी चक्क आपल्या डोळ्यावरचाच महागडा चष्मा टेबलावर आपटला.