बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २३ दिवसांनी संशयित आरोपी वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडीकडे शरण आला आहे. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितली या गुन्ह्यासाठी आपण शरण येत असल्याचे सांगत खूनाच्या गुन्ह्याशी आपला संबंध नसल्याचे वाल्मिक कराडने माध्यमांना सांगितले.