सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांच्या पाठीराख्यांना अटक करण्यासाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा निघणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शी आणि स्वच्छ कारभारासाठी आग्रही आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि झुंडशाही विरोधात पावलं उचलण्यात अपयशी ठरलेत. आता सर्वपक्षीय मुंडेंच्या विरोधात एकत्र आल्याने फडणवीस यांच्या कटकटी वाढल्या आहेत.