मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील प्रशासनाला १०० दिवसांचा सुशासनाचा सात कलमी कार्यक्रम दिला. याच फडणवीस यांच्या ‘विशेष’ मर्जीतील ज्येष्ठ IAS संजीव जयस्वाल यांनी आपल्या म्हाडा कार्यालयातील दालनात एका मराठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला सुरक्षा रक्षक आणि मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यांची तक्रार निर्मल नगर पोलिसांनी दाखल केली आहे. प्रशासकीय या बेदरकार आणि बेफिकीर अधिकाऱ्यांना १०० दिवसांत सुधारणे हे कठीण काम मुख्यमंत्र्यांनी हाती घेतले आहे. अधिकाऱ्यांची मनमानी आणि सामान्य नागरिकांचा जनक्षोभ ही महायुती सरकारची समस्या बनत आहे.
MHADA मुळे मुंबईतील सर्वसामान्यांना घराचा दिलासा- Deepak Kesarkar