बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडत आहे. दररोज नवं नवे खुलासे होत आहेत. यामध्ये आता गोट्या गीते हे नाव आता समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. वाल्मिक कराड साठी याच गोट्या गीतेने एक पोस्ट केली आहे. मात्र त्या रिलच्या कॅप्शनने राजकीय नेतेमंडळींचं देखील लक्ष वेधले आहे. ‘अण्णा माझे दैवत, सदैव सोबत’ असं रील त्यानं इन्स्टावर पोस्ट केलं होतं. हे रील व्हायरल झाल्यानं खरंतर या गोट्या गीतेची चर्चा सुरु झाली. आता हा गोट्या गीते नक्की कोण आहे? त्याच्यावर किती आणि कुठले गुन्हे दाखल आहेत? याची माहिती देणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसंच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या जवळचा तो आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. कोण आहे गोट्या गीते, त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? बघुयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
सिरियल किलरच्या भूमिकेत Bhau Kadam; १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ !