Monday, June 5, 2023

Latest Posts

Doormat कशा करायच्या clean | Lifestyle

घराच्या बाहेर डोअरमॅटवर पाय पुसून मग घरात प्रवेश करायची चांगली सवय अनेकांना असते.

उंबरठ्याच्या आत मध्ये ठेवले जाते. घराच्या बाहेर डोअरमॅटवर पाय पुसून मग घरात प्रवेश करायची चांगली सवय अनेकांना असते. काहीजण डोअरमॅटचा वापर हा शूज किंवा चपला साफ करण्यासाठीही करत असतात. डोअरमॅटला अनेकजण पायपुसणी असेही म्हणतात. पाय पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पायपुसणीचा वापर नियमितपणे होत असतो. सतत वापर केल्याने पायांना लागलेली घाण डोअरमॅटला लागते. परिणामी ते खराब होते. अशा वेळी जर तुम्ही डोअरमॅट धुवून स्वच्छ केले नाही, तर त्याचा वापर करुन पाय साफ करणे शक्य होणार नाही. त्यामुळे डोअरमॅटला चिकटलेली घाण ही घरभर पसरेल. आजकाल बऱ्याचजणांच्या घरी व्हॅक्यूम क्लीनर हे उपकरण असते. या उपकरणाचा वापर करुन डोअरमॅट साफ करता येते. यामुळे डोअरमॅटला लागलेली घाण नाहीशी होते. त्याशिवाय त्यावरचे डागदेखील गायब होतात. पण कधीकधी व्हॅक्यूम क्लीनर वापरुन सुद्धा डोअरमॅट पूर्णपणे स्वच्छ होत नाही. ही गोष्ट तुमच्याकडे कोणत्या प्रकारची डोअरमॅट आहे यावरुन सुद्धा ठरत असते.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss