spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

मी देवेंद्र सरिता गंगाधरराव शपथ घेतो की…. Devendra Fadnavis । Political Journey

मागच्या सहा महिन्यात राजकीय विश्लेषकांच्या अंदाजाला घरचा रस्ता दाखवत महाराष्ट्राचं राजकारण ३६० अंशात फिरलं आणि तो पुन्हा एकदा आलाच. पहाटेचा फसलेला शपथविधी फक्त ८० तासाचाच द्यावा लागलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा शिवसेनेत फूट घडवून आणूनही उपमुख्यमंत्री पदावर झालेली बोळवण, लोकसभेला भाजपचा झालेला दारूण पराभव अशा एकामागून एका अपयशाची, दुःखाची राजकीय पायपीठ तुडवत फडणवीस मात्र चालत राहिले. अगदी शांतीत क्रांती करत आपल्याला उगाच राजकीय चाणक्य म्हणत नाहीत हे त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. पण फडणवीस यांच्या या राजकीय झंजावाताची सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी.

Latest Posts

Don't Miss